सचिव हर्षल कुळे तर खजिनदार भरत धुलप; शहराध्यक्षपदी दीपक निवाते
गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न चिपळूण तालुका ग्रामीण संघ शाखेची निवड प्रक्रिया मुंबई शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २४ रोजी शहरातील ब्राम्हण सहाय्यक संघ चिपळूण येथे पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी पत्रकार संतोष (भाई) कुळे तर सचिव पदी हर्षल कुळे, खजिनदार पदी भरत धुलप आणि शहराध्यक्ष पदी दीपक निवाते यांची निवड करण्यात आली. ही तालुका कार्यकारिणी उपस्थित सभागृहातील समाज बांधवांनी निवडून दिली. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh
यामध्ये अध्यक्षपदी संतोष (भाई) कुळे, उपाध्यक्षपदी सचिन घाणेकर सुरेश गोलमडे, महेश कातकर, हरिश्चंद्र फुटक, संतोष मालप,रवींद्र भाताडे, सचिव पदी हर्षल कुळे, सहसचिव कल्पेश बाईत, खजिनदार भरत धुलप, उपखजीनदार नितेश खाडे, हिशोब तपासणीस मोहन मांडवकर, महिला संघटक सौ लीना फुटक, सल्लागार श्रीराम डिके, हरिचंद्र कांबळी, डॉक्टर शामकांत गजमल, कृष्णा बेटकर आणि शरद शिगवण तर सदस्य पदी -रतन पवार, रमेश खळे, यशवंत फके, प्रदीप उदेग, संजय जाबरे, गजानन वाघे, दिनानाथ रावनंग, शशिकांत वाघे, संतोष बळकटे, डॉ मंदार चांदिवडे, दिलीप बुदर, गजानन भुवड, अमित आदवडे, विलास शिगवण, विजय कोकमकर, अशी कार्यकारिणी करण्यात आली आहे. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh
तसेच चिपळूण शहर कार्यकारणी मध्ये सर्वानुमते शहराध्यक्षपदी दीपक निवाते उपाध्यक्ष रतन पवार, उपाध्यक्ष रमेश खळे, सचिव विजय खापरे यांची निवड करण्यात आली आहे. या सभेला बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. Santhosh Kule, President, Kunbi Samojonnati Sangh