११ ते १४ जानेवारीदरम्यान कार्यक्रम; समुद्र किनारा सफर; व्याख्याने; सी बोट प्रात्यक्षिक
रत्नागिरी, ता. 26 : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवातील कार्यक्रम निश्चित झाले आहेत. येत्या ११ ते १४ जानेवारीदरम्यान हा महोत्सव रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगणार आहे. शिवाय सागरकिनारा सफर, लघुपट, व्याख्याने, होडीतून कांदळवन सफर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आसमंत फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नंदकुमार पटवर्धन यांनी दिली. Sagar Festival in Ratnagiri

महोत्सवाकरिता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी – इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. या महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने सहभागी होऊन पर्यावरण जागृती, सागर संवर्धनात सहभाग घ्यावा, असे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे. Sagar Festival in Ratnagiri
सागर महोत्सवाचे उद्घाटन ११ जानेवारीला सकाळी ९ वाजता भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंग उपस्थित राहतील. ११ वाजता श्रीनिवास पेंडसे यांचे महासागराचे अध्यात्मिक दर्शन यावर प्रवचन होईल. १२ वाजता डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे किनारा आणि सागरी अधिवास यावर व्याख्यान होईल. २ वाजता लघुपट, २.३० वाजता कमांडर व्ही. एम. आपटे (निवृत्त) यांचे हायड्रोग्राफीवर व्याख्यान होईल. ३.४५ वाजता समुद्री गुहांमधील जीवन यावर धनुशा कवाळकर व्याख्यान देतील. ४.४५ ते ५.१५ पर्यंत लघुपट दाखवला जाईल. Sagar Festival in Ratnagiri
१२ जानेवारीला सकाळी पुळणीकिनारा अभ्यास फेरी होईल. यात मार्गदर्शक प्रदीप पाताडे, डॉ. अमृता भावे अभ्यासपूर्ण माहिती देतील. ९.३० वाजता आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान यावर डॉ. विजय मुळ्ये यांचे व्याख्यान होईल. १०.३० वाजता लघुपट, ११.१५ वाजता वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडियाचे डॉ. अनंत पांडे सागरी सस्तन प्राण्यांवर व्याख्यान देतील. १२.१५ वाजता लघुपट, १.३० ते २ लघुपट, २ वाजता आसमंतचा कोस्टल मॅपिंग प्रकल्प यावर डॉ. प्रशांत अंडगे यांचे व्याख्यान होईल. २.३० ते ३ या वेळेत इकोलॉजिकल सोसायटीच्या सायली नेरूरकर व्याख्यान देतील. ३ ते ४ या वेळेत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे व्याख्यान होईल. ४ वाजता लघुपट दाखवला जाईल. त्यानंतर ५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी या खडकाळ किनाऱ्यावर सफर निघेल. यात प्रदीप पाताडे मार्गदर्शन करतील. Sagar Festival in Ratnagiri

१३ जानेवारीला सकाळी ७ ते ८.१५ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर सफर निघेल. यामध्ये प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करणार आहेत. ९.३० राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. समीर डामरे हे मरीन बायोटेक्नॉलॉजी यावर व्याख्यान देतील. १०.३० ते ११ या वेळे लघुपट, ११.१५ वाजता आणि कोरल्स यावर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. नाणजकर व्याख्यान देतील. १२.३० ते १ या वेळेत लघुपट दाखवण्यात येईल. २ ते ३ या वेळेत खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर व्याख्यान देतील. ३.१५ ते ४.३० या वेळेत सी बोट प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने बनवलेली सी- बोट प्रात्यक्षिकात समुद्रात १५० फूट पाण्याखाली पाणबुडी गेली की तिच्यावरील कॅमेऱ्यांतून थेट प्रक्षेपण दाखवण्याचा अनोखा कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे. पाणबुडी खाली पाठवल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पडद्यावर चित्रीकरण पाहता येणार आहे. हा कार्यक्रम अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतर्फे याचे सादरीकरण केले जाईल. ४.४५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढली जाईल. Sagar Festival in Ratnagiri
सागर महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी १४ ला सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत खारफुटी अभ्यास फेऱ्या होणार आहेत. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस मार्गदर्शन करतील. यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. याच दिवशी गोगटे- जोगळेकर कॉलेजमध्ये सागर महोत्सवानिमित्त सागर या विषयावर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याची माहिती गोगटे कॉलेजकडून लवकरच प्राप्त होईल. Sagar Festival in Ratnagiri
