रत्नागिरी, ता. 11 : यावर्षी पाऊस काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ६३ विहिरींच्या निरीक्षणावरून केलेल्या अहवालानुसार हे स्पष्ट केले आहे.ही घट अत्यल्प असली तरी उन्हाची तीव्रता पाहता एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. The ground water level of the district decreased
मागील तीन ते चार वर्षांत पावसाचे प्रमाण पाहता ते समाधानकारक आहे. त्यामुळे गतवर्षी पाण्याची पातळीही वाढली होती. मात्र, यंदा रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाला. त्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याला पाणी टंचाईला सामारे जावे लागते. यावर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत अत्यल्प घट झाली आहे. मात्र, पुढील महिन्यातील तापमानावर जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता अवलंबून राहणार आहे. The ground water level of the district decreased