• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषी विभागातर्फे हळद लागवड उपक्रमाला क्षेत्रभेट

by Ganesh Dhanawade
October 17, 2023
in Guhagar
71 1
0
Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

SK-4 हळदीमुळे आबलोलीचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले; सरपंच वैष्णवी नेटके

गुहागर, ता. 17 : सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या SK-4 हळदीमुळे आबलोली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी व्यक्त केले. कृषी विभाग जि.प.रत्नागिरी व पंचायत समिती गुहागरच्या वतीने ‘हळद पिकांतील विविध कालावधीत करावयाची उपाययोजना व परिणाम’ या विषयावर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाल्या. Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या वतीने 4 तालुक्यात प्रात्यक्षिक स्वरुपात हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रम २०२३ राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी या उपक्रमांतर्गत हळद लागवड केलेल्या शेतक-यांना वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेऊन तांत्रिक मार्गदर्शन करण्याची भूमिका पंचायत समितीच्या कृषी विभागाने घेतली आहे. याचा भाग म्हणून हळद लागवडीच्या चार महिन्यानंतर शेतक-यांना मार्गदर्शन करण्याकरिता हे प्रशिक्षण व क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

यावेळी हळद पिकांच्या विविध अवस्थेत करावयाच्या उपाययोजना का आवश्यक आहे ? यावर कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कंद माशी ही किड हळदीला सर्वात घातक असून या किडींची ओळख करून देवून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजनांबद्दल माहिती गजेंद्र पौनीकर यांनी दिली. Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांनीही शेतक-यांनी दिलेल्या सुचनेनुसार उपाययोजना केली तर अपेक्षीत उत्पादन नक्कीच मिळेल असे सांगितले. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे हळद पिकांत येणारे गवत व तण यामुळे हळदीचा उत्पादन खर्चात वाढ होते. यावर सर्व शेतक-यांनी आपले मत मांडले. यावेळी आबलोली व निगुंडळ येथील हळदीच्या प्लॉटला भेट देवून विविध बाबींवर शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

यावेळी SK-4 चे प्रणेते सचिन कारेकर, पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, चिपळूण पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बी.बी. पाटील, विजय माळी व हळद लागवड केलेले शेतकरी उपस्थित होते. Visit to Turmeric Cultivation by Agriculture Department

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVisit to Turmeric Cultivation by Agriculture Departmentगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.