• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

by Guhagar News
August 12, 2023
in Guhagar
127 1
0
Tree plantation on behalf of Patpanhale College
249
SHARES
712
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 :  तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि  विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.  दि. 3 जुलै ते 8 जुलै या कालावधीत वन महोत्सव  सप्ताह अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने पाटपन्हाळे येथील श्री देव गडगोबा देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाने या महिन्यात सुमारे ५० वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे याबद्दल वनविभाग गुहागर यांचेवतीने शुभेच्छा देण्यात आल्या. Tree plantation on behalf of Patpanhale College

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सनई व डॉ. प्रसाद भागवत यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तृतीय वर्ष कला वर्गातील एनएसएस स्वयंसेवकांनी  वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व ती मदत केली. यावेळी बदाम, चिंच, आवळा, बेल अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. Tree plantation on behalf of Patpanhale College

यावेळी महाविद्यालयामधील कला शाखा विभाग प्रमुख प्रा. प्रमोद देसाई, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, डॉ.जालिंदर जाधव तसेच कार्यालयीन कर्मचारी संदीप चव्हाण यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी गुहागर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री. अमित निमकर गुहागर, श्री. संतोष परशेट्ये वनपाल गुहागर, वनरक्षक श्री. मांडवकर आणि वनरक्षक श्री. दुंडगे उपस्थित होते. Tree plantation on behalf of Patpanhale College

Tree plantation on behalf of Patpanhale College
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPatpanhale CollegeTree plantation on behalf of Patpanhale CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet62
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.