कबड्डी असोसिएशन; नार्वेकर कुटुंबाला आर्थिक मदत
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर याचे काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून निधन झाले. त्याला गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निखिलच्या कुटुंबाला असोसिएशनच्या वतीने 25 हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. Tribute to Kabaddipatu Nikhil

गुहागर तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर हा महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. 18 मे रोजी रात्री कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी भंडारी भवन, गुहागर येथे गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. Tribute to Kabaddipatu Nikhil

या सभेत अनेक खेळाडूंनी निखिलच्या आठवणी जाग्या केल्या. निखिलने गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या तृप्तीनगर अडूर कबड्डी संघातून खेळताना जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपल्या नेत्रदिपक खेळ केला आहे. गुहागर तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उंचावले होते. कबड्डीसाठी आवश्यक असणारा व्यायाम दररोज न चुकता तो करत असे. तसेच संघातील इतर नवोदित खेळाडूंकडूनही तो नियमित व्यायाम करून घ्यायचा. एका हसतमुख, निस्वार्थी, जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करणाऱ्या कबड्डीपटूला आपण मुकलो आहोत. असे उमेदे व्यक्तिमत्त्व गेल्याने गुहागर तालुक्यातील कबड्डी खेळात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. तसेच निखिलच्या कुटुंबाला २५ हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. Tribute to Kabaddipatu Nikhil
