किरण खरे, विकास आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींना दोष देणे चुकीचे
गुहागर, ता. 17 : शहराचा विकास आराखडा नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेवून करण्यात आला नव्हता. त्यात अनेक त्रुटी होत्या. म्हणूनच या विकास आराखड्याला स्थगिती मिळाली आहे. शिवाय हरकतींसाठी 25 मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत आराखड्यातील त्रुटी दाखवून देणाऱ्या हरकती जनतेने घ्याव्यात. हरकतींची छाननी करुनच विकास आराखडा बनविण्यात येईल. अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Guhagar Development Plan
गुहागर शहरातील नागरिक मंचच्या सदस्यांनी तसेच भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी दोन दिवस मुंबईत मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता या सर्वांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर भाजपने गुहागरमध्ये या भेटीचा वृत्तांत सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. Guhagar Development Plan


या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे म्हणाले की, गुहागर शहराचा विकास आराखडा हा नगरपंचायतीने बनवलेला नव्हता. आराखडा बनविण्यापूर्वी प्रसिध्द झालेल्या सद्यस्थितीतील जमिन वापर नकाशामधील त्रुटीही नगररचना विभागाने दुरुस्त केल्या नव्हत्या. प्रारुप विकास आराखडा देखील नगरपंचायतीने बनवलेला नव्हता. तयार केलेला प्रारुप विकास आराखडा नगरपंचायतीकडे देण्यात आला. हा आराखडा प्रसिध्द करण्यासाठी एक कालावधी नगरपंचायतीला देण्यात आला. तेव्हा हा विकास आराखडा नगरपंचायतीने बनवला हे म्हणणेच चुकीचे आहे. विकास आराखड्यातील अनेक त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींनी केला. मात्र त्यातील केवळ 4 ते 5 दुरुस्त्या विकास आराखड्यात करण्यात आल्या. त्यामुळे सदोष विकास आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींना दोष देणे चुकीचे आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 30 मिटरचा महामार्ग आहे. रस्ते विकास महामंडळाने न पाठवलेला महामार्ग परस्पर विकास आराखड्यात दाखण्यात आला. गंभीर बाब म्हणजे या महामार्गाचे नावही संबंधितांनी लपवले. अशा अनेक त्रुटी आराखड्यात आहेत. Guhagar Development Plan
गुहागर नागरिक मंच आणि भाजपचे कार्यकर्ते मंत्री महोदयांना पटवून देण्यात यशस्वी झाले. म्हणूनच 14 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सध्याच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळाली. याचा अर्थ हा विकास आराखडा रद्द झाला असे समजु नये. गुहागरवासीयांच्या भेटीनंतर 16 मार्चपर्यंत असणारी हरकतींची मुदत 25 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही गुहागरवासीयांसाठी संधी आहे. या संधीचा उपयोग करुन शहरवासीयांनी विकास आराखड्यातील विविध त्रुटी, दोष दाखविण्याऱ्या हरकती घ्याव्यात. या हरकतींची छाननी करुनच विकास आराखडा बनविण्यात येईल. Guhagar Development Plan
या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष संगम मोरे, गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी पदाधिकारी उपस्थित होते. Guhagar Development Plan