विकास आराखडा विरोधात नागरिक एकवटले
गुहागर, ता. 09 : गुहागरचा विकास आराखडा सदोष आहे. गुहागरची भौगोलिक रचना, पुर्वांपार असलेली लोकवस्ती आदी अनेक बाबींचा विचार या आराखड्यात नाही. सर्वांनी पक्षभेद, मतभेद विसरून एकत्र येऊन या विकास आराखडा रद्द करावा हे ध्येय समोर ठेवूया असे ठरले. या विकासा आराखड्यात सर्वात जास्त बाधा आणणारे रस्ते तसेच इतर बाबींवर प्रत्येकाने लवकरात लवकर नगरपंचायत मध्ये हरकती घेऊन गावाचे एकत्रित निवेदन घेऊन संबंधित मंत्री व शासकीय खात्याकडे पाठवण्याचे ठरले. Guhagar Development Plan
गुहागर विकास आराखडा संदर्भात आज भंडारी भवन येथे गुहागर विकास मंचचे दीपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, प्रथमेश दामले, ओंकार गद्रे व अद्वैत जोशी यांनी गुहागर शहरवासीयांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी दीपक कानगुटकर, अमरदीप परचुरे, किरण खरे यांनी या आराखड्यासंदर्भात केलेला पत्र व्यवहार व जी माहिती मिळवली होती ती सर्व नागरिकांना सांगितली. Guhagar Development Plan


या विकास आराखड्यात समुद्रा लगत बागायतदारांचे बागेतून नारळ, पोफळीतुन बारा मीटरचा रस्ता आहे. यामुळे झाडे तोडून पर्यावरणास धोका होणार आहे व बागायतदारांचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. यामुळे हा रस्ता रद्द करावा. तो बागायत सोडून समुद्रालगत शासनाच्या जागेत घ्यावा. तसेच 200 मीटर पर्यंत सीआर झेडच लाईन असूनही येलो झोन आहे. परंतु यात कोणत्याही प्रकारचे बांधकामच करता येणार नाही. तसेच सध्याचा मुख्य रस्ता हा 12 मीटरचा असून नवीन विकास आराखड्यात 18 मीटरचा आहे. सध्या असलेल्या रोड मध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होत नाही. परंतु हा रस्ता नवीन रस्ता झाल्यास या रस्त्यालगत असलेल्या दुतर्फी सर्व घरांचे व धार्मिक स्थानाचे नुकसान होत आहे. तसेच लगत असलेल्या पाण्याच्या स्त्रोतालाही धक्का लागत आहे. यामुळे हा रोड बारा मीटरचाच राहावा. 30 मीटरचा असलेला कोस्टल हायवे याला कोणतेही नाव नाही. यासाठी सर्व शेत जमिनी जाणार आहेत. यामुळे हा रस्ता रद्द करावा. अष्टवणे येथून 18 मीटरचा बायपास रस्ता दाखवला आहे. तो रस्ता पूर्ण डोंगर पोखरून होत असल्यामुळे भविष्यात त्याचे माळीन व्हायला वेळ लागणार नाही, तो रस्ता पलीकडून व्हावा. या आराखड्यात नवीन व्यवसायाला जागाच उपलब्ध नाही. कासव संवर्धनाला धोका होणार आहे. यात अनेक सर्वे नंबरची जागा हललेली आहे. यामुळे हा विकास आराखडा रद्द होऊ शकतो असे अनेकांनी आपले मत मांडले. नागरिकांना हरकती घेण्यासाठी अनेकानी मदत करणार असल्याचे सांगितले. Guhagar Development Plan
यावेळी मयुरेश साखरकर, मयुरेश कचरेकर, भरत शेटे, विकास जाधव, निलेश मोरे, ज्योती परसुरे, दिगंबर मोरे, शशिकांत शिंदे, राकेश साखरकर, विकास जाधव, राजू आरेकर, सचिन खरे यांनी आपली मते व्यक्त केली. सर्व पक्षीय भेद न ठेवता हा विकास आराखडा रद्द करून आनंदी गाव ठेवूया असे ठरले. यानंतर एका कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. Guhagar Development Plan