गावाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट व ध्येय
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत झोंबडी गावची ग्रामदेवता श्री काळभैरव ग्रामविकास आघाडी पॅनलने बाजी मारली. पॅनलचे सरपंचपदी माजी सरपंच अतुल अनंत लांजेकर पुन्हा एकदा सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या पॅनलमधुन अफजल महमंद ममतुले, प्रणाली प्रदीप पवार, संदीप वासुदेव गोणबरे, जैनब अब्दुल वहिद ममतुले, मयुरी महेश लांजेकर हे सदस्य निवडून आले. Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar
यावेळी सरपंच अतुल लांजेकर यांनी सांगितले की, २०१७ रोजी सरपंच निवडणुकीपुर्वी झोंबडी गावाला विकासकामे संदर्भात वचननामा दिला होता. त्यावेळी आपल्यावर विश्वास ठेवुन गावाने आम्हाला निवडुन दिले. वचननाम्यातील बहुतांश विकासकामे व अन्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी तालुक्याचे आमदार भास्कर जाधव, तत्कालीन जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि. प. सदस्य नेत्रा ठाकूर व प.स. सदस्य यांच्या सहकार्यामुळे तसेच ग्रा.प. सदस्य व नागरिक यांच्या पाठींब्यामुळे पूर्ण करण्यास यश आले. सरपंचपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर सर्व ग्रा. प. सदस्य व नागरिक यांनी मोलाचे सहकार्य दिले. सर्वांच्या सहकार्यामुळेच झोंबडी गावात करोडो रुपयांची विकासकामे पुर्ण होऊ शकली. Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar

आताच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत गावाने सरपंच पदी चांगल्या मताने विजयी केले आहे. गावातील मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिल्याने झोंबडी गावाचा विकास अधिक जोमाने होणार आहे. झोंबडी गावाचा विकास करणे हे एकमेव उद्दीष्ट व ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मी सरपंच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. गावाने माझ्यावर जो विश्वास टाकला असून त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेन. यापुढील काळात सर्व नागरिक मला सहकार्य करतील, अशी अपेक्षाही अतुल लांजेकर यांनी व्यक्त केली. Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar