गुहागर, ता. 9 : तालुक्यातील चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर मा. जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशातील ग्राहक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वात मोठ्या ग्राहक संघटनेचे कोकण प्रांताचे (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अध्यक्ष आहेत. Zagde’s election to Consumer Protection Council

गेली २० वर्ष ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ते काम करत होते. यावेळी ग्राहक संघटन, ग्राहक जागृती, ग्राहकांच्या विविध समस्या सोडविणे, ग्राहक संरक्षण कायद्याचे उद बोधन, विविध हायस्कुल, महाविद्यालय येथे विद्यार्थी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेच आयोजन, तहसील कार्यालय व अन्य ठिकाणी राष्ट्रीय व जागतिक ग्राहकदिनाचे आयोजन करून ग्राहक हिताशी संबंधीत मार्गदर्शन, ग्राहकाला काही समस्या निर्माण झाल्यास ग्राहक व संबंधित वस्तू किंवा सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्यात समन्वयातून मार्ग काढणे, समन्वय न झाल्यास संबंधित ग्राहकाला जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय आयोगाकडे जाण्यास विनामूल्य मार्गदर्शन करणे, मोफत मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध समस्या सोडविणे, कोकण प्रांतातील कार्यकर्त्याचा अभ्यासवर्ग घेऊन संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटनात्मक बांधणी करणे. ग्राहकांच्या हिताशी संबंधीत अखिल भारतीय स्तरावरून येणाऱ्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणे, विविध संस्था, मंडळे, शासकीयकार्यालये इ. ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक जागृती उदबोधन करणे, विध्यार्थी ग्राहकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थी ग्राहक गट योजना राबवून सुजाण जागृत ग्राहक निर्माण करणे अशी विविध ग्राहकाभिमुख कार्य स्वतः, संघटना व कार्यकर्ते यांचे माध्यमातून केलेली आहेत. Zagde’s election to Consumer Protection Council

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्याने ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षाचा ग्राहक क्षेत्रातील अनुभव ग्राहक समस्या निराकणासाठी होणार आहे. आपल्या अभ्यासू व सेवाभावी वृत्तीने ग्राहक हिताशी संबंधीत विविध विषय ग्राहक संरक्षण परिषदेत मांडून जिल्ह्यातील ग्राहकांना विविध समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी श्री. झगडे यांचे अभिनंदन करून पुढील यशदायी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Zagde’s election to Consumer Protection Council
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपल्याने नव्याने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सुमारे 19 जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत. ते पुढीलप्रमाणे..
नगरपरिषद सदस्य – प्रविण जाधव. ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी – चंद्रकांत खोपडकर, चंद्रकांत धोत्रे, अल्लाउद्दीन ममतुले, पद्माकर भागवत, सुहेल मुकादम, अंकिता शिगवण, रमजान गोलंदाज, सुशांत जाधव, चंद्रकांत झगडे, श्रीकांत चाळके. वैद्यकीय व्यवसायाचे प्रतिनिधी – डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. विद्या दिवाण. व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी – सुनिल रेडीज, शकील शेख मजगांवकर. पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी – दत्ताराम लिंगायत, मनिषा कुवेसकर. शेतकरी प्रतिनिधी – दिनकर आमकर, संजय बामणे या सर्वांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मुदत आदेशाच्या दिनांकापासून 3 वर्षे इतकी राहील. Zagde’s election to Consumer Protection Council
