• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डोहात बुडून बालकासह तरुणाचा मृत्यू

by Guhagar News
June 21, 2023
in Ratnagiri
465 4
1
Youth with child drowned in river
912
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना

गुहागर, ता. 21 :  चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी (ता. 19) दुपारी घडली होती. मंगळवारी (ता. 20) दोघांचेही मृतदेह पाली डोहात आढळले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. Youth with child drowned in river

याबाबत चिपळूण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमळी गोंधळेवाडी येथील विक्रम रविंद्र देवांग (२३) व हर्षल अनिल यादव (११) हे दोघे सोमवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी पाली मारुती मंदिरजवळच्या वाशिष्ठी नदीच्या डोहात उतरले होते. त्यांची दुचाकी, मोबाईल व अन्य वस्तू पाली पुलावर होत्या. सकाळी घराबाहेर पडलेले दोघेही रात्रीपर्यंत घरी न आल्याने रात्री उशीरा चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असताना आज मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हर्षल यादवचा मृतदेह आढळला. पाली ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. तर विक्रम देवांग याचाही काही वेळाने डोहात मृतदेह आढळला. पाचवीत शिकणाऱ्या हर्षलला पोहता येत नव्हते. कदाचित तो बुडताना त्याला वाचविताना विक्रमही बुडाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. Youth with child drowned in river

दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी शंकर यादव व लक्ष्मण रसाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सायंकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर ओमळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही मुलांचा बुडून दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. Youth with child drowned in river

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarYouth with child drowned in riverगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share365SendTweet228
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.