सहायक आयुक्त इनुजा शेख
रत्नागिरी, ता. 10 : महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता संस्थांनी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये आणि उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या नावानुसार १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये अर्ज करावेत. Youth should participate in Innovation Challenge
नोंदणी करण्याकरिता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ०२३५२- २९९३८५ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा. यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी इनोव्हेशन चॅलेंज मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. Youth should participate in Innovation Challenge


राष्ट्रीय स्तरावर सप्टेंबर २०१० मध्ये मा. पंतप्रधान यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाविन्यता परिषद (National Innovation Council – NinC) ची स्थापना करण्यात आली असून सदर परिषदेचा मुख्य उद्देश “देशातील युवकांमधील सृजनशीलता विकसित करून त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातून नवनिर्मिती करणे, त्याकरिता पोषक वातावरण तयार करणे, नवनवीन संकल्पनांचा विकास करणे, नविन कार्यपध्दती, निर्मितीपध्दती, वितरण प्रणाली इत्यादी बाबींच्या अंर्तभावासह गतिमान व संवेदनशील पध्दतीने व्यवस्थापन, शासन व्यवस्था निर्माण करणे व त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हा आहे. त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नियोजन विभागाच्या ०४ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. Youth should participate in Innovation Challenge


महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. परंतु योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. यावर्षी महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेण्याचा आणि त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साध्य करण्यासाठी त्यांना संभाव्य पाठिंबा देण्यासाठी एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी सदर इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. Youth should participate in Innovation Challenge


या उपक्रमाच्या नोंदणीकरीता संस्थानी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये आणि उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या नावानुसार ०१ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये अर्ज करावेत. सदर नोंदणी करण्याकरीता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ०२३५२- २९९३८५ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त युवकांनी इनोव्हेशन चॅलेंज मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन इनुजा शेख, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे. Youth should participate in Innovation Challenge