• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूरमधील तरुणाने केली आत्महत्या

by Mayuresh Patnakar
May 12, 2023
in Guhagar
434 5
0
Youth in Adur committed suicide
853
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु आहेत. या कार्यक्रमादरम्यान तरुणाने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. Youth in Adur committed suicide

अडुर पड्याळवाडीतील अनिकेत सुभाष नार्वेकर (वय 29) या तरुणाने गुरुवारी, 11 मे रोजी रात्री 1. 45 नंतर कधीतरी राहत्या घरातील त्याच्या शयनकक्षात गळफास लावून आत्महत्या केली. 12 मे रोजी सकाळी 6 च्या दरम्यान अनिकेतला उठविण्यासाठी घराच्या मंडळीनी हाक मारली. मात्र खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अनिकेतच्या शयनकक्षाला असलेली खिडकी उचकटून त्याचा लहान भाऊ अक्षय खोलीत शिरला. तेव्हा सिलींग फॅनला लाल रंगाच्या ओढणीने गळफास लावून अनिकेतने आत्महत्या केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. Youth in Adur committed suicide

याबाबतची माहिती अनिकेतचा लहान भाऊ अक्षय नार्वेकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत नार्वेकर चालक म्हणून काम करीत असे. स्वभावाने तापट असलेल्या अनिकेतचे घराच्या मंडळींशी फारशी बोलाचाली होत नसे. गुरुवारी रात्री देखील काही किरकोळ कारणांवरुन त्यांचे घरी भांडण झाले होते. मित्रांकडून वारंवार किरकोळ रक्कम उधारीवर घेण्याची त्याला सवय होती. तसेच दारु पिण्याचेही व्यसन होते. तणावाखाली येवून अनिकेतने आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेचा अधिक तपास गणेश कादवडकर करीत आहेत. Youth in Adur committed suicide

दरम्यान हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या दरम्यान अडूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतच्या घराजवळच श्री पड्याळदेव मंदिरात सत्यनारायणाची महापुजा आणि पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनिकेतच्या आत्महत्येमुळे पड्याळवाडीवर शोककळा पसरली आहे. Youth in Adur committed suicide

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarYouth in Adur committed suicideगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share341SendTweet213
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.