• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्रिकेट खेळताना कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

by Mayuresh Patnakar
October 20, 2026
in Guhagar
81 1
0
Youth dies while playing cricket
159
SHARES
454
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण चवंडेवठार परिसरावर तीव्र शोककळा पसरली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. Youth dies while playing cricket

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी स्मित चवंडे हा आपल्या मित्रांसोबत चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात नेहमीप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळला. हा प्रकार पाहून मैदानावरील मित्रांची एकच धावपळ उडाली. त्याचा मित्र युगेश सावंत याने तातडीने स्मितचा भाऊ सुशांत चवंडे याला फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता स्मित याला सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथील पारकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक तपासणीअंती स्मित याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. Youth dies while playing cricket

खेळताना अचानक घडलेल्या या दुर्देवी प्रसंगामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजि. नं. १३१/२०२६ नुसार नोंद केली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. Youth dies while playing cricket

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth dies while playing cricketटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.