• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
April 7, 2023
in Guhagar
502 5
0
Youth dies in bike accident

याच दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला

985
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शीरमधील घटना, काजुच्या फांदीने घात केला

गुहागर, ता. 07 : शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले. पोलीसांपर्यंत ही माहिती पोचल्यावर घटनास्थळी जावून पोलीसांनी दोघांना आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. बेशुध्द असलेल्या दुसऱ्या तरुण उपचारा दरम्यान शुध्दीवर आल्यावर मृताची ओळख पटविण्यात आली. Youth dies in bike accident

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिपळूण तालुक्यातील कादवड गावातील शैलेश सुनील जाधव (वय 20) आणि रोहीत दिपक निकम (वय 19) हे दोन तरुण शुक्रवारी पहाटे 4 वाजता दुचाकीने (एमएच 08 यू 2356 ) तवसाळकडे निघाले होते. तवसाळला आंबा काढणीचे कामासाठी चालले होते. सकाळी 6 च्या सुमारास ते शीर येथे आले. खालची शीर येते आबलोली रस्त्यावर एक तीव्र वळण आहे. या वळणात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात शिरले. तेथे काजुच्या झाडाची एक फांदी आडवी आली होती. दोघेही या फांदीवर आपटून बेशुध्द पडले. जवळपास अर्धातास हे तरुण बेशुध्दावस्थेत होते. 6.30 च्या सुमारास ग्रामस्थांनी हा अपघात पाहून पोलीस ठाण्यात खबर दिली. तातडीने गुहागरचे पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीसांनी शैलेश आणि रोहीतला बेशुद्धावस्थेतच आबलोली आरोग्य केंद्रात नेले. आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी यांनी शैलेश सुनील जाधव या मयत असल्याचे घोषीत केले. तसेच रोहीत निकमवर उपचार सुरु केले. Youth dies in bike accident

उपचारादरम्यान रोहीत शुध्दीवर आल्यानंतर त्याने ही सर्व हकिकत पोलीसांना सांगितली. त्यामुळे मृत शैलेशच्या नातेवाईकांना कळविणे शक्य झाले. दोघांच्याही डोक्याला फांदीवर आपटून गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी दुपारनंतर रोहीत निकम याला अधिक उपचारांकरीता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शव विच्छेदनानंतर शैलेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत. Youth dies in bike accident

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarYouth dies in bike accidentगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share394SendTweet246
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.