तरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा
संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभार
माझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक झालो . . . ३३ वर्षाच्या संघाच्या आजपर्यंतच्या प्रवासात जात म्हणून कधीच वाईट अनुभव आला नाही. . . संघ कामात कार्यकर्ता म्हणून अधिक गतीने कामाला लागलो तेव्हा सुरुवातीच्या काळात कोकणात काम करताना नवीन ठिकाणी जात म्हणून अडचण आली देखील परंतू केवळ “संघाचा स्वयंसेवक” ह्या दोन शब्दांमुळे जात म्हणून असणाऱ्या अडचणींची तीव्रता एकदम नष्ट नाही परंतू कमी होत असे असाच सर्वदूर प्रवासातील अनुभव. संघ कामात अनेक ब्राम्हण जातीतील कार्यकर्ते . . . तरी देखील आजपर्यंत संघकार्यात कधी मला जात म्हणून अस्तित्त्व सापडले नाही. अनेक ब्राम्हण कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यावर घरातील वातावरण आणि घरातील पद्धती पाहिल्यावर कधी कधी पोटात गोळा येत असे. . . परंतू त्याच कुटुंबातील स्वयंसेवक कार्यकर्त्याचे माझ्या सोबत असणारे आचरण बघितल्यावर संघाच्या कार्यामुळे समाजातील जात कधीतरी नक्की नष्ट होईल हा दृढ विश्वास मनात दिवसेंदिवस वाढतच गेला. Young generation needs to think positively
ब्राम्हण समाजाचे समाजातील आचरण ह्याविषयी जेव्हा ब्राम्हण समाजातील कार्यकर्त्यांशी चर्चा होत असे तेव्हा अनेक जेष्ठ अनुभवी स्वयंसेवक कार्यकर्ते त्यावेळी सांगत असत माझ्या घरात जोपर्यंत माझे आजी-आजोबा किंवा माझे आई-वडील हे कुटुंबाचे प्रमुख आहेत तोपर्यंत माझ्या घरात सोहळं इत्यादी गोष्टी राहाणार परंतू कुंटुंबातील संघाच्या वातावरणामुळे हळूहळू घरातील काही ठिकाणीच उदाहरणार्थ देवघर . . स्वयंपाकघर इथपर्यंतच ते सोहळं आहे . . . हळूहळू ते देखील जाईल आणि ज्या दिवशी कुटुंबाचा प्रमुख मी होईन तेव्हा ते पूर्णपणे नाहिसे होईल. . . हा कार्यकर्त्याचा विश्वास केवळ संघाच्या कार्यामुळेच आणि मी 1998-99 च्या काळात ज्या ज्या ब्राम्हण कुटुंबात ते सोहळे – वागणं बघितलं होत ते वातावरण नंतर 2010 च्या दरम्यान बदललेलं देखील बघितलेले आहे. Young generation needs to think positively
एक दलित म्हणून मी ठामपणे आज सांगू शकतो संघाच्या संस्कारामुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तीगत आचरणामुळेच समाजातील जात म्हणून मानसिकता जाऊ शकते. पूजनीय सरसंघचालक नेहमी सांगतात संघ काहीही करणार नाही परंतू संघाचे स्वयंसेवक समाजासाठी सर्वकाही करणार. . . समाजातील सकारात्मक बदल हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ज्या संघ स्वयंसेवकाला पूजनीय डॉ. हेडगेवार थोडेफार समजले तो समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात असो तो प्रत्यक्ष संघात असो अथवा संघाच्या बाहेर विविध विषयात असो . . . . तो व्यक्तीगत जीवनात जे काही करेल ते पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या संस्कारांचाच एक भाग असेल. स्वयंसेवकांच्या व्यक्तीगत सामाजिक आचरणामुळेच समाजातील जात पाळण्याच्या विषयातील तीव्रता कमी झाली आहे. परंतू वर्तमानात सुरू असणारे राजकारण आणि समाजकारण हे समाजाच्या हिताचे होण्यापेक्षा आपापल्या व्यक्तीगत स्वार्थासाठी सुरू आहे. Young generation needs to think positively
वरील लेख प्रपंच करण्यामागे कारण … काल इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलीने मला विचारले की, काका मराठा म्हणजे काय ? मराठा आंदोलन कशासाठी ? …. तिच्या अनेक प्रश्नांनी मला खूप विचारात पाडले. . . त्यात शेवटचा तिचा प्रश्न – मग माझी जात कुठली ? ह्या प्रश्नानंतर मात्र माझ्या पायाखालील जमीन सरकली आणि मनामध्ये अनेक प्रश्नांचे काहूर माजले . . . समाजातील नष्ट होत चाललेली जातीयता पून्हा नव्याने जरांगे या आंदोलनाने प्रस्तापित होत आहे. आणि ह्या सर्व सामाजिक परिस्थितीला वर्तमानातील सर्व राजकीय पक्ष आणि समाजकारणाच्या नावाने समाजात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना जबाबदार आहेत. . . ही सर्व मंडळी समाजात विविध विषयांद्वारे समाजात फूट पाडण्याचे काम करित आहे. Young generation needs to think positively
जरांगेचे आंदोलन कशासाठी सुरू आहे हे आज मला फार महत्त्वाचे वाटत नाही परंतू प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या तिसरीच्या मुलीने ” माझी जात कुठली ? ” हे विचारणे भविष्याच्या विकसित भारतासाठी नक्कीच नवीन आव्हाने घेऊन येतील यात मात्र शंका नाही. . . महाराष्ट्राच्या नव्या तरुण पिढीने सकारात्मकपणे ह्यासर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. Young generation needs to think positively