गुहागर, ता. 19 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी बीबीए विभागांतर्गत योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी योग प्रशिक्षक मा. सौ अदिती गणेश धनावडे उपस्थित होत्या. Yoga workshop at Regal College
सर्वप्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर मा. सौ. आदिती गणेश धनावडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले. यानंतर त्यांनी विविध आसने प्राणायाम आणि ध्यान या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, वक्रासन, वज्रासन, मंडू कासन, पद्मासन, भद्रासन, पवन मुक्तासन, सायकलींग, भुजंगासन, नौकासन, आणि शवासन यासारख्या आसनांचा समावेश होता. तसेच मनःशांतीसाठी काही विशेषतंत्र शिकवली. प्रत्येक आसनानंतर प्रशिक्षकांनी त्याचे फायदे, योग्य पद्धत आणि आसन करताना घ्यावयाची काळजी याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी ताणतणाव कसा कमी करावा, एकाग्रता कशी वाढवावी आणि नियमित योगाभ्यासाने सकारात्मक जीवनशैली कशी स्वीकारावी हेही समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन योगासनांचा सराव केला. Yoga workshop at Regal College
कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट शारीरिक फिटनेस मानसिक ताण कमी करणे आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून देणे होते. कार्यशाळेच्या शेवटी मा. सौ. आदिती गणेश धनावडे यांनी योग केवळ शारीरिक व्यायाम नसून तो जीवनाला दिशा देणारी जीवनशैली आहे हा संदेश देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सदर कार्यशाळेसाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, व रिगल कॉलेज शृंगारतळी च्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. Yoga workshop at Regal College