गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात (Patpanhale College) बुधवार दि. २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शृंगारतळी येथील साहिल योग केंद्राचे योग प्रशिक्षक श्री. साहिल जांभळे उपस्थित होते. Yoga Day concluded in Patpanhale College

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी वरीष्ठ प्राध्यापक प्रमोद देसाई, आयक्यूएसी प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सौम्या चौघुले आणि योग प्रशिक्षक श्री. साहिल जांभळे यांचे विभागाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. श्री. जांभळे यांनी गेली चार वर्षे शृंगारतळी येथे योग केंद्रात मार्गदर्शन करीत असून योगाबाबत जनतेत जागृती घडून येत आहे. विद्यार्थ्यांनी तर तंदुरुस्तीसाठी नियमित योग करावा असे आवाहन केले. त्यांनी ताडासन, त्रिकोणासन, अर्ध चक्रासन अशा काही आसन प्रकारांचे आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांच्या बरोबरीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही योगासनाचे विविध प्रकार जाणून घेऊन प्रत्यक्ष योगासने करण्यात उत्साहाने सहभाग घेतला. Yoga Day concluded in Patpanhale College

यावेळी बोलताना कला शाखा प्रमुख प्रा. प्रमोद देसाई म्हणाले की, योगासने करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो. शिवाय योगसनांमुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करणे गरजेचे आहे. योग हि आपल्या संस्कृतीची प्राचीन देणगी असून आपल्या सरकारने अलीकडील काळात योगाचा प्रसार व प्रचार करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला आहे. Yoga Day concluded in Patpanhale College

योगदिन कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुभाष खोत, डॉ. दिनेश पारखे, ग्रंथपाल धनंजय गुरव शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण सनये यांनी केले तर सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार डॉ. प्रसाद भागवत यांनी मानले. Yoga Day concluded in Patpanhale College