गुहागर, ता. 22 : गुहागर येथील श्री.देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील विज्ञान महेश जनार्दन भोसले वाणिज्य व विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये एनसीसी विभागाने श्री. वैभव ढोणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रकिनाऱ्यावर योगासनाचे प्रात्यक्षिक केले. Yoga Day celebrated in Guhagar High School
विद्यालयाच्या सकाळ सत्रामध्ये पर्यवेक्षिका सौं.सुजाता कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना योगाची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून करून घेतली. तसेच दुपार सत्रामध्ये मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री गंगावणे सर, क्रीडाशिक्षक श्री गोयथळे सर व हळदणकर मॅडम, श्री. पाडवी सर, श्री. स्वप्निल कांबळे सर यांच्या उपस्थितीत योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री.खोतसर, सौ.बावधनकर मॅडम, माळी मॅडम व सर्व शिक्षकांनी उपमुख्याध्यापक श्री. कोरके सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांकडून योगांची प्रात्यक्षिके सादर केली. Yoga Day celebrated in Guhagar High School
यावेळी इयत्ता दहावी अ या विद्यार्थिनी कु. चारुता मंदार आठवले हिने योग दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. चित्रकला विभागाच्या प्रमुख सौ पाकळे मॅडम यांनी सुंदर व आकर्षक फलक लेखन केले. अशाप्रकारे सर्व विभागातून योगाचे मुलांना महत्त्व व माहिती देऊन योग दिन साजरा करण्यात आला. Yoga Day celebrated in Guhagar High School