गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगा दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कंपनीतील सर्व अधिकारी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी व सर्व कामगारांना योगा दिवसाची शपथ तसेच योगा प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन त्यांच्याकडून विविध व्यायाम व योगासने करून घेण्यात आली. Yoga day at Ratnagiri Gas and Power Company
या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने सर्व कर्मचारी व कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरात योगासने शिकविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते. Yoga day at Ratnagiri Gas and Power Company