छत्रपती पुरस्कार प्राप्त
रत्नागिरी, ता. 21 : चिपळूण कादवड येथील कु. याशिका शिंदे हिला राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगरी केल्याबददल महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम असा श्री. छत्रपती पुरस्कार दिला. यासाठी सहयाद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा चिपळण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते; संस्थेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. Yashika felicitated by Sahyadri Education Institute

यावेळी आमदार शेखर निकम यांनी याशिका हिचे वडिल विश्वजित शिंदे, तिची आत्या नंदा देसाई यांना यापुर्वी श्री. छत्रपती पुरस्कार मिळाला असल्याने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे अडरे गावचे सुपुत्र पुणे येथे वास्तव्यास असणारे श्री. संतोष कदम यांचा हि सत्कार कण्यात आला. याशिका ला शुभेच्छा देताना आमदार साहेब म्हणाले की, भविष्यात येणा-या राष्ट्रीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा किंवा ऑलंपिक स्पर्धामध्ये यश संपादन करुन देशासाठी पदक प्राप्त करशील. Yashika felicitated by Sahyadri Education Institute

यावेळी आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडीक, विधानसभा अध्यक्ष रमेश राणे, स्वप्नील शिंदे, दिनेश कदम, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, सरपचं शेखर उकार्डे, युवक अध्यक्ष निलेश कदम, सिकंदर चिपळूणकर, सचिन साडविलकर, शामकांत कदम, जयवंत अदावडे, बावा राजेशिर्के, संतोष कदम, विश्वजित शिंदे, संजय कदम, राजा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. Yashika felicitated by Sahyadri Education Institute
