राजेंद्र कुलकर्णी, यशस्वी भव:” संस्थेतर्फे कामाला सुरवात
गुहागर, ता.10 : मुंबई येथील यशस्वी भव: (Yashassvi Bhavh) या संस्थेने जानेवारी 2028 पर्यंत 25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती या संस्थचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. राजेंद्र कुलकर्णी सर लेखक, प्रेरणादायी वक्ते व लाइफ कोच आहेत. आजपर्यंत कुलकर्णी यांनी हजारो विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या कार्यशाळेमध्ये येऊन 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. तसेच 20,000 पेक्षा अधिक कुटुंबांनी सरांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे जीवन सुंदर बनवले आहे. Yashassvi Bhavh Objectives of the organization
प्रभावी पालकत्व (Happy Parenting), Happy Marriage Life, आकर्षणाचा सिद्धांत (लॉ ऑफ अट्रॅक्शन), मनी मॅग्नेट, माईंड पॉवर वर्कशॉप, अशा विविध सेमिनार्स व कार्यशाळा मार्फत लोकांचे जीवन आनंदी करण्यास मदत केली आहे. Make Your Life More Beautiful व तुमचे जीवन अधिक सुंदर बनवा ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असुन या पुस्तकाचा खपही प्रचंड आहे. कोरोना लॉक डाऊन मध्ये आकर्षणाचा सिद्धांत(Law Of Attraction ) व मनी मॅग्नेट या कार्यशाळांचा हजारो लोकांनी फायदा घेऊन त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. Yashassvi Bhavh Objectives of the organization
आपण समाजाचे काही देणे लागत असतो. समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. म्हणूनच समाजाकरता काहीतरी भरीव कार्य करण्याची सरांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्या “यशस्वी भव: ” ( Yashassvi Bhavh ) या संस्थेने जानेवारी 2028 पर्यंत 25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या संस्थेचे इतर डायरेक्टर सौ अनुपमा कुलकर्णी मॅडम, श्री आशुतोष कुलकर्णी सर व सौरभ कुलकर्णी सर यांची खूप मोलाची साथ सरांना होत असते. Yashassvi Bhavh Objectives of the organization
गुहागर न्यूज ला राजेंद्र कुलकर्णी यांची लेखमाला आता आम्ही प्रसिद्ध करणार आहेत
श्री राजेंद्र कुलकर्णी (लेखक, प्रेरणादायी वक्ता व लाइफ कोच) मोबाईल: 8652253900/ 9930653355