गुहागर, ता. 10 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे दि. 07 ऑगस्ट रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा व प्रख्यात लेखिका शिल्पा खेर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. Writer Shilpa Kher interacted with students
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा विभाग प्रमुख पी. बी. जाधव यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सन्माननीय लेखिका शिल्पा खेर यांचे पर्यवेक्षक गंगावणे सर यांनी तर उपस्थित सुयोग पानकर यांचे सावंत मॅडम यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. Writer Shilpa Kher interacted with students


लेखिका शिल्पा खेर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आत्मविश्वास म्हणजे काय ? तो कसा वाढवला पाहिजे यावर चर्चा केली. आजच्या विद्यार्थ्यांनी छंद जोपासताना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे व रोजनिशी लिहावी असे सांगितले. त्यांनी मेरी क्युरी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन दिला. विद्यार्थ्याशी संवाद साधताना प्रश्न विचारत विद्यार्थ्याना बोलत केले. विद्यार्थ्यानीही उत्तम प्रतिसाद दिला. त्यांची यश म्हणजे काय ?, Just Belive या पुस्तकांव्यतिरिक्त अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. Writer Shilpa Kher interacted with students
असे विविध उपक्रम राबविण्यास शाळा समिती अध्यक्ष दिपक कनगुटकर यांचे कायम मार्गदर्शन लाभत असते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एम. एस. गंगावणे, मराठी विभाग प्रमुख पी. बी. जाधव, जेष्ठ शिक्षिका एम.ए. सावंत मॅडम, सौ एस एस ठाकूर मॅडम, एस.एस . भोसले व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. Writer Shilpa Kher interacted with students