तहसीलदार वराळे, महिला सक्षमीकरणाचे बाळकडु मिळाले
गुहागर, ता. 14 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान आणि लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या वतीने रविवारी कुमारिका पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरी नारायण मंदिरामध्ये अधिक श्रावण मास निमित्ताने पुरुषोत्तम पूजा व शहरातील 55 कुमारिकांचे पूजन करण्यात आले. यामध्ये गुहागर बाग, वरचापाट, जांगळवाडी येथील अंगणवाडीतील मुली तसेच शहरातील मुलींचा समावेश होतो. Worship of virgins at Kopari Narayan temple


श्री देव कोपरी नारायण देवस्थानच्यावतीने कुमारिका पूजनासाठी आवश्यक साहित्य व तसेच कुमारिकांना भेट देण्यासाठी शैक्षणिक साहित्य व्यवस्था केली होती. तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष वरंडे, सचिन मुसळे, विनोद गुहागरकर, गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, माधव ओक, निखिल तांबट, डॉ. अनिकेत गोळे, दिवेश आरेकर, गुहागर हायस्कुलचे उपमुख्याध्यापक मधुकर गंगावणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, पत्रकार सत्यवान घाडे, मंदार गोयथळे, संकेत गोयथळे विवेकानंद जोशी गुरुजी, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी गणेश पावसकर, नगरपंचायतचे लिपिक जनार्दन साटले, तहसीलदार कार्यालयातील शिपाई प्रदिप पालांडे, ॲड. सिध्दार्थ जोगळेकर, विवेक खरे, निखिल ओक, आदींनी कुमारिकांचे पूजन केले. Worship of virgins at Kopari Narayan temple


या कार्यक्रमाबाबत बोलताना तहसीलदार सौ. वराळे म्हणाल्या की, आपल्याकडे आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत नेहमीच बोलले जाते. परंतु कोणतीही भाषणबाजी न करता, बालवयातच महिला सक्षमीकरणाचा संस्कार मुलींवर करणारा तसेच समाजावर बिंबवणारा हा छान उपक्रम आहे. कुमारिकेची पुजा करुन, तिच्यासमोर नतमस्तक होताना आपल्या मनात महिलांबद्दल काय भाव असावा याचा संदेश आपोआपच दिला जातो. आज प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे म्हणाले की, आजच्या कुमारिका पुजनाचे घोषवाक्य करु महिलांचा सन्मान, हीच आमची संस्कृती महान खूप महत्त्वाचे आहे. लायन्स क्लबने देखील महिला सक्षमीकरणासाठी वर्षभर काम करण्याचा संकल्प केला आहे. देवस्थानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक समीर घाणेकर यांनी सांगितले की, आज प्रातिनिधीक स्वरुपात तीस + तीन कुमारिकांचे पूजनाचे नियोजन आम्ही केले होते. प्रत्यक्षात 55 कुमारिकांचे पूजन करण्यात आले. यानंतर गुहागर शहरातील 333 कुमारिकांना अधिक मासाचे वाण आम्ही देणार आहोत. Worship of virgins at Kopari Narayan temple


देवस्थानचे विश्र्वस्त रवींद्र दामले, अनिल वैद्य, महेश दीक्षित, मनिष खरे, अमित जोशी, अद्वैत जोशी, अद्वैत गोखले, मयुरेश पाटणकर यांच्यासह सुयोग जोशी, मंदार पटवर्धन, प्रथमेश परांजपे व अर्थव घाणेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. Worship of virgins at Kopari Narayan temple