गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी परिसरातील पालपेणे रोडवरील असणार्या सुप्रसिद्ध श्री गणेश भेल पाणीपुरी सेंटर वरून पालपेणे येथील श्री नामदेव पडवेकर यांनी आपल्या लहान नातवांसाठी या पाणीपुरी सेंटरवरून पाणीपुरीसाठी लागणारा रगडा घेऊन गेले होते. घरी गेल्यानंतर आपल्या नातीला तो रगडा गरम करायला सांगितलं तिने तो गरम करायला सुरुवात केल्याने आतून किडे जनक अळ्या काळ्या रंगाच्या वरती येऊ लागल्या तिनेही हि गोष्ट आपल्या आजोबांच्या लक्षात आणून दिली. नामदेव पडवेकर यांनी लगेचच शृंगारतळी येथे राहणारे आपल्या मित्राला याची कल्पना दिली व त्या पाणीपुरी सेंटर वरून जाऊन याची चौकशी करायला सांगितले. Worms found in food at Panipuri Centre


त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पाणीपुरी सेंटरवर जाऊन याबाबत पाणीपुरी सेंटरच्या मालकाकडे याची चौकशी केली व तिथे असणार्या रगड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर आतून किडे बाहेर आले. हे सर्व बघितल्यानंतर पाणीपुरी मालकाने माझ्याकडून चूक झाली हा विषय वाढवू नका असे सांगितले व मी तुम्हाला दहा हजार रुपये देतो पण हा विषय वाढवू नका असे ग्राहकाला सांगितले. मात्र ग्राहकांनी असे सांगितले की मला पैशाची आवश्यकता नाही हे चुकीचे झाले असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे, असे नामदेव पडवेकर यांनी टाइम्स स्पेशल जवळ बोलताना सांगितले. आता आरोग्य विभाग आणि अन्न भेसळ विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. Worms found in food at Panipuri Centre