गुहागर, ता. 09 : तालुक्यातील जानवळेच्या सुकन्या योगिता यशवंत खाडे हिने ताशकंद, उझबेकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पँक्रेशन अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताचे नेतृत्व करून कांस्य पदक पटकविले आहे. विविध खेळांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू, योगिता हिने रियाध, सौदी अरेबिया 2023 (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी) यांच्या मान्यतेने वर्ड कॉम्बैट गेमसाठी जगातील टॅाप आठ खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. योगिताच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. World Pankration Championship 2023

योगिता खाडे गुहागर तालुक्यातील जानवळे येथील रहिवासी आहेत. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापिठातून बी. पीएड, मुंबई विद्यापिठातून एम. पीएड, योगशास्त्र कवी कालिदास संस्कृत विद्यापिठातून एम.ए. पदवी प्राप्त केली असून आता मुंबई विद्यापिठातून शारीरिक शिक्षण विषयात पी.एचडी प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला आहे. तिने गुहागरमध्ये क्रीडा प्रकारची कोणतीच सुविधा नसताना अपार मेहनत आणि जिद्द या जोरावर अगदी लहान स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नसलेली किक बॉक्सिंग, कराटे, क्वाय मार्शल आर्ट, टेनिस फुटबॉल, स्पोर्ट डान्स, कुडो मार्शल आर्ट, बेल टरेसीलिंग, रग्बी, एरोबिक्स असे अनेक खेळ सुरू केले. त्या खेळांचा प्रचार आणि प्रसार केला. त्या स्वतः यातील काही खेळांच्या आंतर राष्ट्रीय खेळाडू, बेस्ट रेसलिंग, रग्बी, एरोबिक्स, तायक्वाडो, या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, फुटबॉल टेनिस, सोफ्ट टेनिस, कबड्डी अशा खेळांच्या राज्य खेळाडू आहेत. मुंबईत राहून अपार मेहनत करून त्यांनी गेल्यावर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. World Pankration Championship 2023

योगिता हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना देशाला कांस्य पदक मिळवून दिले आहे. यासाठी भारताचे अध्यक्ष सी. ए. तांबोली, उमर तांबोली, कोच डॅानी रॅानी यांचे मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुक्यातील जानवळे सारख्या ग्रामीण भागात राहून योगिता खाडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. World Pankration Championship 2023
