पुणे, ता. 02 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने देशातील राज्यांची राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून त्यातून भविष्याचा वेध घेणारी धोरणे आखण्यास मदत होईल; असे मत कार्यशाळेत सहभागी देशभरातील मान्यवरांनी व्यक्त केले. Workshops are important link between Center and State

राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम आणि कायदे याबरोबरच योजना तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाला मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Workshops are important link between Center and State

पुण्यातील येरवडा भागातल्या हॉटेल दी रिट्झ कर्ट्नमध्ये झालेल्या सदर विभागीय कार्यशाळेत पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दिव दमन, दादर नगर हवेली आणि गोवा असे १२ राज्यांचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी झाले होते. Workshops are important link between Center and State
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्रसिंग यांनी ही कार्यशाळा भविष्यकालीन उपायोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे सांगून सर्व राज्यांनी अशा कार्यशाळातून त्या त्या राज्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्य आपल्या राज्यात राबवावे, त्याचप्रमाणे इतर राज्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा देखील घ्यावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. Workshops are important link between Center and State

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव, इंदिरा मूर्ती यांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य हे इतर राज्यांसाठी आदर्शवत असून त्यातून इतर राज्यांनी प्रेरणा घ्यावी. राज्याच्या समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम हे निश्चितच इतर राज्यांच्या अधिकारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने ते अनुकरणीय असल्याचेही इंदिरा मूर्ती यांनी अखेरीस नमूद केले. तसेच महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी राज्य शासनाचे, आणि समाज कल्याण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले. Workshops are important link between Center and State

पंजाब राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार यांनी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून अशा देशपातळीवरील कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्यासाठी त्यांनी केंद्र शासनास विनंती केली. देशातील राज्य राज्यात सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचा तसेच सामाजिक कल्याणाच्या योजनांमध्ये निश्चितच अशा कार्यशाळांमुळे बदल घडण्यास मदत होणार असल्याचे आशावाद त्यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला. Workshops are important link between Center and State
सदर कार्यशाळेचा समारोप हा राज्याच्या सादरीकरणातून करण्यात आला. राज्याचे समाज कल्याण विभागाच्या आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी विभागात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत विभागाची यशोगाथा यावेळी सादर केली. यावेळी व्यासपीठावर भारत सरकारचे सहसचिव आर पी मीना यांच्यासह 12 राज्यांचे सचिव, संचालक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देश पातळीवरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी समाज कल्याण विभागाला धन्यवाद दिले. Workshops are important link between Center and State