रत्नागिरी, ता. 07 : शास्त्रामध्ये समाविष्ट असलेले, परंपरेमध्ये सामावलेले आणि प्रयोगात असलेले या तिन्ही परीप्रेक्ष्यातील ज्ञान या भारतीयज्ञान परंपरेत सामावले असून ते उपयोगात आणता येऊ शकते, असे प्रतिपादन रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल यांनी यांनी गुरुवारी येथे केले. तीन दिवसीय भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळेच्या उद्घाटनात ते बोलत होते. Workshop on Indian Knowledge Tradition
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय (नवी दिल्ली) यांच्या सहाय्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा (स्वायत्त) संस्कृत विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने व चाणक्य विश्वविद्यापीठ (बंगळुरू) यांच्या भारतीय ज्ञान परंपरा केंद्राच्या ज्ञान सहयोगाने ही कार्यशाळा संस्कृत उपकेंद्रात सुरू झाली. डॉ. शुक्ल यांच्यासमवेत मंचावर मार्गदर्शक म्हणून चाणक्य विद्यापीठाचे डॉ. विनायक रजत भट, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आदी उपस्थित होते. Workshop on Indian Knowledge Tradition


कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल यांनी भारतीय ज्ञान परंपरेचे आधुनिक संदर्भातील महत्त्व यावर प्रकाश टाकला. ज्ञान, कर्म, साधन यांच्या संयोगाने ही कार्यशाळा होत असून प्रायोगिक स्वरूपाची अशी ही कार्यशाळा आहे, असे ते म्हणाले. तीन दिवसात होणाऱ्या या कार्यशाळेच्या माध्यमातून अलिखित स्वरूपाचे ज्ञान लिखित स्वरूपात कसे आणता येईल, लिखित स्वरूपात असलेले ज्ञान प्रयोगात व्यवहारात कसे उपयुक्त ठरेल आणि परंपरेने आपल्यापर्यंत प्राप्त झालेले ज्ञान भावी पिढीला कसे देता येईल, यावर विचारमंथन करण्यात यावे, असे सांगितले. Workshop on Indian Knowledge Tradition
डॉ. देवानंद शुक्ल यांनी आवाहन केले की भारतीय ज्ञान परंपरेचा आधुनिक विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुण संशोधकांनी आणि प्राध्यापकांनी या क्षेत्रात अधिक योगदान द्यावे. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती विकसित करून भारतीय ज्ञान परंपरेच्या आधारे नवीन दृष्टिकोन तयार करण्याचे आवाहन केले. भारतीय ज्ञान परंपरेची जागतिक पातळीवरील उपयुक्तता अधोरेखित करताना शुक्ल यांनी सांगितले की, नव्या युगातील शिक्षण व्यवस्थेत भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रांचा योग्य समावेश झाला पाहिजे. यामुळे जागतिक ज्ञानप्रवाहात भारताचा ठसा अधिक दृढ होईल. Workshop on Indian Knowledge Tradition


डॉ. दिनकर मराठे यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती बाळगून भारतीय ज्ञान परंपरेचा सखोल अभ्यास करावा असे प्रतिपादन करत केवळ परंपरेने चालत आलेल्या शास्त्रात प्रतिपादित केलेल्या गोष्टींचाच अंतर्भाव भारतीय ज्ञान परंपरेत होतो असे नाही तर शास्त्रामध्ये उद्धृत नसलेल्या परंतु परंपरेने प्रायोगिक स्वरूत व्यवहारात असलेल्याही विषयांचा समावेश या भारतीय ज्ञान परंपरेत होतो, असे सांगितले. Workshop on Indian Knowledge Tradition
प्रादेशिक भाषांमधील ज्ञान भारतीय ज्ञान परंपरेत यावे, असे प्रतिपादन डॉ. विनायक रजत भट यांनी केले. त्यांनी भारतीय ज्ञान परंपरा या विषयाची पृष्ठ भूमिका मांडत या कार्यशाळेत पुढील तीन दिवस कोणत्या पद्धतीने कार्य होणार आहे, याची माहिती दिली. प्रामुख्याने भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे केवळ संस्कृत भाषेत समाविष्ट असलेले ग्रंथ साहित्य नसून प्रत्येक प्रदेशानुसार निर्माण झालेले साहित्य यात अंतर्भूत होऊ शकते. याच विचाराच्या आधारे या कार्यशाळेत प्रामुख्याने महाराष्ट्रातील विद्वानांनी मराठी किंवा संस्कृत भाषेत जे ज्ञान साहित्य निर्माण केले त्याचे संकलन केले जाणार आहे. असे ते म्हणाले. Workshop on Indian Knowledge Tradition
कार्यक्रमाचे मंगलाचरण नाणीज संस्थांतील हितेश गुरुजी आणि सहकारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश चव्हाण यांनी केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. कार्यशाळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील आणि रत्नागिरी उपकेंद्रातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Workshop on Indian Knowledge Tradition