रत्नागिरी, ता. 17 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे चिपळुणमध्ये एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये सीए शिरीष रहाळकर यांनी कंपनी वगळता इतर व्यवसायिक संस्थांची आर्थिक पत्रके व त्यावरील मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली. Workshop in Chiplun by CA Institute

यावेळी सीए अभय आरोलकर यांनी सीए फर्मसाठी होणारे पिअर रिव्ह्यू कार्यपद्धती आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत व्याख्यान दिले. सीए चैतन्य जोशी यांनी आर्थिक वर्ष २२-२३ चे टॅक्स ऑडिट करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. सीए अंजली फाटक यांनी सूत्रसंचालन केले. आणि सीए सुमेध करमरकर यांनी आभार मानले. Workshop in Chiplun by CA Institute

