• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

by Mayuresh Patnakar
December 24, 2022
in Guhagar
74 2
0
Workshop conducted in KDB college
147
SHARES
421
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वैदिक गणित आणि खगोलशास्त्र विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा

गुहागर, ता. 24 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, गुहागर (Khare-Dhere-Bhosle College, Guhagar) येथे १९ व २० डिसेंबर २०२२ रोजी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणित आणि खगोलशास्त्र या विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस उद्घाटक म्हणून डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांची उपस्थिती लाभली. त्यांचे हस्ते सहभागी विद्यार्थ्याना ‘अभ्यास संच’  देऊन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सदर कार्यशाळेस एकूण ४४ विद्यार्थी उपस्थित होते. Workshop conducted in KDB college

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी डॉ. बापट यांनी आपल्या भाषणामध्ये प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेला विज्ञानविकासाचा प्रवास उलगडून सांगितला आणि वैदिक गणिताची तसेच पारंपारिक भारतीय खगोलशास्त्राची अभ्यासकांनी आधुनिक विज्ञानाशी सांगड घालणे कसे आवश्यक आहे हे विशद केले. कार्यशाळेत प्रा. अभिजीत यादव व प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी मार्गदर्शक म्हणून वैदिक गणिताच्या पद्धतीने बेरीज- वजाबाकी-गुणाकार-वर्ग-घन क्षणार्धात कसे काढता येतात यासंबंधी तसेच सूर्यमाला, तारे, आकाशनिरीक्षण, पंचांगातील खगोलशास्त्र, खगोलशास्त्रासाठी उपयुक्त सॉफ्टवेअर्स इ. विषयांवर व्याख्याने दिली. Workshop conducted in KDB college

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य विराज महाजन यांचे हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२२ रोजी दुर्बिणीद्वारे आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. ज्याचे संचालन चिपळूण येथील शिक्षक श्री. दीपक आंबवकर यांनी केले. या वेळी शनि, गुरु आणि मंगळ हे ग्रह तसेच रात्रीच्या आकाशातील प्रमुख राशी व नक्षत्रांचे दर्शन रंजक महितीद्वारे घडविण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे ७० विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी घेतला. Workshop conducted in KDB college

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorkshop conducted in KDB collegeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.