गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) वेबसाईट समिती अंतर्गत एकदिवसीय प्रशासकीय प्रशिक्षण कार्यशाळा ही महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनसाठी दिनांक १३/०८/२०२२ रोजी सकाळी ९:०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. Workshop conducted in KDB college


एकदिवसीय कार्यशाळा ही i) Basic Website Maintance ii) Examination Software iii) Central Documentation System या विषयांवर घेण्यात आली होती. सदर कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. व्ही. सावंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकेत्तर कर्मचारी हा महाविद्यालयाचा महत्वाचा अंग असून त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळेत सहभाग घेऊन स्वतःला अद्ययावत करावे असे आव्हान केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. प्रविण कदम यांनी केले. Workshop conducted in KDB college


प्रा. पी. एस. सरपोतदार यांनी Examination Software बद्दल अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले आणि Examination Software काळजीपूर्वक वापर करावा असे नमूद केले. प्रा. ए. डी. यादव यांनी Central Documentation Syste या विषयांवर मार्गदर्शन करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना Hands on training दिले. महाविद्यालयातील एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी श्री. दिपक देवकर यांनी आपल्या मनोगतातून या कार्याशाळेबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा. संतोष जाधव यांनी सर्वांचे आभार मानून एकदिवसीय कार्यशाळेची सांगता केली. Workshop conducted in KDB college