• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

by Manoj Bavdhankar
May 10, 2023
in Ratnagiri
55 1
0
Women's Democracy Day in Ratnagiri
109
SHARES
310
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी दि.10 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात “जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन” साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याप्रमाणे माहे मे 2023 रोजी चा महिला लोकशाही दिन सोमवार 15 मे 2023 रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित केला आहे. Women’s Democracy Day in Ratnagiri

रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, “रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनव्दारे संपर्क करुन 15 मे 2023 रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या 1077 या टोलफ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ वाजता या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती रत्नागिरी यांनी कळविले आहे. Women’s Democracy Day in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWomen's Democracy DayWomen's Democracy Day in Ratnagiriगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.