गुहागर, ता. 05 : ज्ञानरश्मि वाचनालय गुहागरतर्फे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाचनालयाच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा सन्मान, उत्कृष्ट बालवाचक सन्मान तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्या व सहभागी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. Women’s Day at Gyanrashmi Library

तसेच सर्व महिलांसाठी विविध फनी गेम्स, (खेळातील पहिल्या विजेत्या महिलेला बक्षीस ) होम मिनिस्टर चा खेळ रंगणार आहे. या खेळातील प्रथम विजेत्या महिलेला साडी व सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्या महिलेला भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. यावेळी सर्व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. Women’s Day at Gyanrashmi Library