गुहागर, ता. 19 : कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. शनिवारी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारक व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. Women doctor’s murder protested by doctors in Guhagar

हल्लेखोराला तत्काळ अटक करा, डॉक्टरांना संरक्षण द्या, या घटनेची सीबीआय चौकशी करा, सेंट्रल प्रोटेक्शन अॅक्ट लागू करा असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखिल जाधव, डॉ. गौरी गावड, परिचारिका श्रीमती कानडे, श्रीमती पवार, श्रीमती सोलकर, श्रीमती पोलाजी, श्री. विशाल ससाणे, श्री. सावंत, श्री. दर्शन, श्री. मयेकर, श्री. रोशन आदी सहभागी झाले होते. Women doctor’s murder protested by doctors in Guhagar