रत्नागिरी, ता. 07 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे. Women Democracy Day


लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. Women Democracy Day