• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर, दापोलीतील महिलांनी सैनिकांना केले रक्षाबंधन

by Mayuresh Patnakar
August 24, 2026
in Maharashtra
146 1
15
Women celebrated Raksha Bandhan with soldiers
286
SHARES
817
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : जम्मु जवळील सुचितगड सीमेवर जाऊन गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी सीमेवरील वीर सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांनी तुम्ही लक्षात ठेऊन आठवणीने आमच्यासाठी राखी आणि प्रेम आणले यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला सांगितले. तुम्ही आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत आहात. त्यामुळेच आम्ही सगळेजण सुखाने आपापल्या घरात झोपू शकतो असे या महिलांनी सांगितले.  Women celebrated Raksha Bandhan with soldiers

Women celebrated Raksha Bandhan with soldiers

भारताच्या सीमेवरील पूछ जिल्ह्यातील बुढा अमरनाथ बाबा चट्टानी यांची यात्रा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या नेतृत्वात  सुरू आहे. या यात्रेसाठी गुहागर आणि दापोली तालुक्यातील 18 जण गेले होते. परतीच्या प्रवासात जम्मू जवळील सुचित गड या सीमेवर जाऊन या सगळ्यांनी पाकिस्तानची सीमा बघितली. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय सैनिकांजवळ संवाद साधला आणि त्यावेळी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.  Women celebrated Raksha Bandhan with soldiers

Women celebrated Raksha Bandhan with soldiers

यामध्ये  सौ आसावरी भावे, सौ अनुष्का आठवले, सौ स्वरदा भिडे, सौ गौरी भिडे, सौ स्वाती महाडिक, सौ दिपाली साठे, सौ अद्विता परांजपे, सौ रंजना गिरी, सौ मीरा जोशी, दिपाली गिरी, आर्या भावे अशा महिला आणि श्री अनिरुद्ध भावे, दीपक साठे, चंद्रकांत महाडिक, उमेश आठवले, मंगेश जोशी, मनीष साखरकर असे सहा पुरुष कार्यकर्ते एकूण 18 जण या यात्रेत सहभागी झाले होते. Women celebrated Raksha Bandhan with soldiers

Women celebrated Raksha Bandhan with soldiers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWomen celebrated Raksha Bandhan with soldiersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.