• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूरच्या तरुण वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

by Mayuresh Patnakar
May 19, 2023
in Guhagar
1.4k 14
3
Wireman dies of electrocution

याच वीजेच्या खांबावर निखीलला वीजेचा धक्का बसला

2.7k
SHARES
7.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कर्देतील घटना, कबड्डीपटु असल्याने क्रीडा क्षेत्रावरही शोककळा

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने निखील नार्वेकर, (वय 23, रा. अडूर) या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 18 मे) रात्री  8.30 वा घडली. निखील उत्तम कबड्डीपटु असल्याने अडूर गावाबरोबरच क्रीडा क्षेत्रात आणि महावितरणमध्ये शोककळा पसरली आहे. शुक्रवारी (ता. 19 मे) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Wireman dies of electrocution

निखील नार्वेकर हा कर्दे परिसरात वायरमन म्हणून महावितरणमध्ये नोकरीला होता. कर्दे गावातील वीजप्रवाह खंडीत झाल्याची माहिती त्याला मिळाली. किरकोळ दुरुस्ती असेल असा विचार करुन निखील आपल्या साथीदाराला न घेता कर्दे गावात गेला. ज्या वीजेच्या खांबावर दुरुस्ती करणे आवश्यक होते. तेथील वीज प्रवाह खंडीत करण्याची व्यवस्थाही निखीललाच करणे भाग होते. मात्र हा वीज प्रवाह खंडीत करताना चुकून निखीलने दुसऱ्याच भागातील वीजप्रवाह खंडीत केला आणि काम करण्यासाठी तो वीजेच्या खांबावर चढला. तेथील वीजप्रवाह सुरु असल्याने कामाला सुरवात करताच क्षणी त्याला वीजेचा धक्का लागला आणि तो वीजेच्या खांबावरुन खाली कोसळला. वीजेच्या धक्क्याबरोबरच उंचावरुन जमीनीवर आपटल्याने निखील जागीच मृत्यूमुखी पडला. कर्देतील ग्रामस्थांनी तातडीने त्याला वैद्यकिय उपचारांसाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. शुक्रवारी (ता. 19) सकाळी चिखली येथेच शवविच्छेदन करुन निखीलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  Wireman dies of electrocution

23 वर्षीय निखील नार्वेकरचे गाव अडूर. तेथील तृप्तीनगर कबड्डी संघाचा तो अष्टपैलु खेळाडू. उत्तम चढाईकार म्हणून गुहागर तालुक्यात त्याची ओळख आहे. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रात्री अनेकांनी कर्दे येथे धाव घेतली. Wireman dies of electrocution

अवघ्या 23 व्या वर्षी निखीलचे अपघाती निधन झाल्याने महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रामाणिकपणे काम करणारा, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबध असलेला कर्मचारी अशी त्याची ओळख आहे. कर्दे येथे जाताना निखील आपल्यासोबत साथीदाराला घेवून गेला असता तर कदाचित हा अपघात टळला असता. अशी प्रतिक्रिया महावितरणचे उपअभियंता गलांडे यांनी व्यक्त केली. तातडीची मदत म्हणून निखीलच्या कुटुंबियांना महावितरण गुहागरचे कर्मचारी वैयक्तिरीत्या सहभागातून आर्थिक मदत करणार आहेत. Wireman dies of electrocution

दरम्यान या घटनेची नोंद सौ. सुमित्रा विरेंद्र यादव, पालशेत यांनी गुहागरला केली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल जी.डी. कादवडकर करीत आहेत.  Wireman dies of electrocution

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWireman dies of electrocutionगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share1080SendTweet675
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.