गुहागर, ता. 26 : ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द केला. विनगेम सारखा कौशल्याचा खेळ खेळणे हा एक व्यावसायिक क्रियाकलाप मानला जातो आणि तो रोखीने खेळणे देखील भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(जी) अंतर्गत संरक्षित आहे. Wingame is not gambling but a game of skill

प्राथमिक माहिती अहवालाचा (एफआयआर) विचार करता याचिकाकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. परंतु, त्यानंतरही याचिकाकर्त्यांना खटल्याला सामोरे जावे लागले तर ते कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असे निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका मान्य करताना नोंदवले. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती एमएम साठय़े यांच्या खंडपीठाने खेळ हा कौशल्याचा आहे आणि संधीचा नाही आणि त्यामुळे तो ‘जुगार’च्या कक्षेत येत नाही, असे निरीक्षण नोंदवत विनगेम विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे. Wingame is not gambling but a game of skill
