• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न

by Ganesh Dhanawade
October 7, 2022
in Guhagar
18 0
0
Wildlife Week at Patpanhale College
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.07 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्य जीव सप्ताह संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना वन्य प्राण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने वन विभाग व आर्ट्स रिसोर्स सेंटर यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Wildlife Week at Patpanhale College

या कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्राचार्य प्रमोद देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात पर्यावरण संरक्षणासाठी वन्य प्राण्याचे रक्षण करणे ही आपली सामुदायिक जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. Wildlife Week at Patpanhale College

कार्यक्रमात “वन्य प्राण्याची जोपासना व संरक्षण” या विषयावर रत्नागिरी येथील वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक गिरीश बापट यांनी डिजिटल पद्धतीने जागतिक पातळीवर वन्य प्राण्यांचे प्रकार आणि त्याची जीवन शैली यावर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. Wildlife Week at Patpanhale College

यावेळी गुहागरचे परिमंडळ वन अधिकारी श्री. संतोष परशेट्ये, वनपाल सामाजिक वनीकरण गुहागरचे श्री. निमकर, वनरक्षक सहाय्यक श्री. अरविंद मांडवकर, श्री. संजय दुंडगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद भागवत यांनी तर आभार प्रदर्शन आर्ट्स रिसोर्स सेंटर प्रमुख डॉ. दिनेश पारखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील डॉ. जालिंदर जाधव, सौम्या चौघुले, ग्रंथपाल धनंजय गुरव, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. Wildlife Week at Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWildlife Week at Patpanhale Collegeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.