जंगलातील निसर्ग वाचायला, अनुभवायला शिका : श्री निलेश बापट
गुहागर, ता.11 : आपल्या देशात दि.१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर मध्ये राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह अंतर्गत दि.०६ ऑक्टोबर २०२२ रोजी खरे- ढेरे-भोसले महाविद्यालय, (Khare-Dhere-Bhosle College) गुहागर येथे निसर्ग अभ्यासक श्री निलेश बापट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. Wildlife Week at KDB College
कोकणातील जंगलांमध्यें अनेक दुर्मिळ वनस्पती व वन्यजीवांचे अस्तित्व आहे. श्री निलेश बापट यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रत्नागिरी जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्षी जगताची ओळख उत्कृष्ट छायाचित्रे व विडिओ क्लिप्सच्या माध्यमाने करून दिली. याच बरोबर कोकण प्रदेशमध्ये आढळून येणाऱ्या अनेक प्राण्यांची ओळख (उदा. बिबटे, रानमांजर, खवलेमांजर, उडणारी खार, तरस, पिसूरी हरीण, रानगवे, ई.) व त्यांच्याबद्दलची अतिशय रंजक माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना वैज्ञानिक परिभाषेत उत्तरे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. Wildlife Week at KDB College
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.श्री विराज महाजन यांनी महाविद्यालयातील निसर्ग सवंर्धनच्या लहान लहान प्रयत्नांची माहिती दिली. उदा. Reduce – Reuse – Recycle ह्या तीन आरचे पालन, कागदांचे वापर कमी करण्याचे प्रयोग, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन व इतर. लोक सहभागामधून निसर्ग संवर्धनाचे काम पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. Wildlife Week at KDB College
सदरील कार्यक्रमास फॉरेस्ट डिपार्टमेंट, गुहागर येथील मा.श्री संतोष परशेटये-परिमंडळ, वन अधिकारी, रत्नागिरी, मा.श्री अमित निमकर- वनपाल, सामाजिक वनीकरण विभाग, गुहागर, श्री अरविंद मांडवकर-वनरक्षक व श्री संजय दुडगे-वनरक्षक,गुहागर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.श्री गोविंद सानप यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी महाविद्यालयातील नेचर क्लबच्या समन्वयक सौ.शितल मालवणकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. Wildlife Week at KDB College