गुहागर, ता. 16 : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये नुकतीच रानभाज्या रेसीपी स्पर्धा संपन्न झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा संपन्न झाली. Wild Vegetables Recipe Competition at Sringaratali

या स्पर्धेसाठी परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून शांताई रिसोर्टचे सिद्धेश खानविलकर व त्यांचे सहकारी श्री. साळवी उपस्थित होते. पावसाळी ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. याचेच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्व, त्यांची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने रिगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Wild Vegetables Recipe Competition at Sringaratali

कार्यक्रमामध्ये सर्व प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी श्री सिद्धेश खानविलकर व त्यांचे सहकारी श्री. साळवी यांचे श्रीफळ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यानंतर श्री.खानविलकर यांनी फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या रानभाज्यांपासून पदार्थ बनविले. त्यामध्ये रानभाज्यांपासून कबाब, सुरणाचे थालीपीठ, टाकळ्याचे मोमोज, टाकळा कटलेट, अळूची कुरकुरीत पाने, टाकळ्याचे चीज रोल, अळंबीचे समोसे, खवणीची वडी यांसारख्या रेसिपींचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.पायल घाडगे, द्वितीय क्रमांक कु. प्रणाली पालकर आणि तृतीय क्रमांक कु. मिसबा तुरुक या विद्यार्थीनिनी पटकविला. Wild Vegetables Recipe Competition at Sringaratali

रानभाज्या स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित परीक्षकांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना वेवेगळ्या हॉटेल सर्विसेसची माहिती दिली. शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या वेगवेगळ्या संधी कशा प्रकारे उपलब्ध याविषयी विस्तृत माहिती दिली. त्यात होणाऱ्या ट्रेनिंग विषयी तसेच भाषेचे महत्व पटवून दिले. रानभाज्या रेसीपी स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या ५० ते ५५ मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. शाहरुख चोगले आणि स्पर्धेचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रा. विक्रम खैर यांनी केले. Wild Vegetables Recipe Competition at Sringaratali
