• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शीर येथे “रानभाज्या प्रदर्शन”

by Mayuresh Patnakar
September 2, 2023
in Guhagar
76 1
1
"Wild Vegetable Exhibition" at Sheer
149
SHARES
427
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 पाककला स्पर्धेस महिलांचा सहभाग; शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 :  दहिवली – खरवते येथील  शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी, कृषी दुतांनी प्राचार्य डॉ.सुनित कुमार पाटील व मिथून पाटील यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यातील शीर येथे जि. प. आदर्श केंद्र शाळा शीर नं.१ च्या विद्यार्थ्यांकडून शेती विषयक पुरक असे “रानभाज्या प्रदर्शन” व “पाककला स्पर्धा” आयोजन करण्यात आले होते. “Wild Vegetable Exhibition” at Sheer

"Wild Vegetable Exhibition" at Sheer

या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी विवीध प्रकारच्या रानभाज्या, त्यांची छायाचित्रे व माहिती प्रदर्शित केली होती. रानभाज्या पाककला स्पर्धेसाठी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. स्पर्धेत २० महिला बचत गटातील महिलांनी रानभाज्यांपासून ३५ वेगवेगळे  पदार्थ बनवून आणले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत बक्षीस म्हणून फुल झाडांचे वितरण केले व प्रत्येक सहभागी महिला बचत गटाला दालचिनीची रोपे भेट म्हणून दिली. पाककला स्पर्धेत विजयी महिला गट काडसिद्धेश्वर, त्रिवेणी,वाघजाई,  प्रेरणा, मानाई, प्रगती या बचतगटांच्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. “Wild Vegetable Exhibition” at Sheer

"Wild Vegetable Exhibition" at Sheer

सदर उपक्रम ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पार पडला. रानभाज्या का खाव्यात, त्यांचे महत्त्व काय आहे हे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सदर गटात कु.सतेज नेवगी, कु.वैभव नागले, कु.शंतनु लिमये, कु.अभिषेक निर्मळ, कु.निशांत फडतरे हे विद्यार्थी कृषी दूत दोन ते अडिच महिने शीर येथे राहून शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालय दहिवली –  खरवते या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सुनित कुमार पाटील व मिथुन पाटील यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली शेती विषयक पुरक असे विवीध उपक्रम राबवून शीर गावातील शेतक-यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देऊन शेतक-यांच्या विवीध समस्यांचे  समाधानकारक निवारण करीत आहेत. “Wild Vegetable Exhibition” at Sheer

"Wild Vegetable Exhibition" at Sheer

या कार्यक्रमाला गावकरी आणि विशेषतः बचतगटांच्या महिला बहूसंख्येने उत्सफूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी,कृषीदूतांनी राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे शीर पंचक्रोशीतून कौतूक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतीथी म्हणून शीर चे  सरपंच श्री.विजय धोपट, उपसरपंच श्री.अमित साळवी, ग्रामविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र देवकाते, माजी तालुका उपसभापती श्री.सिताराम ठोंबरे, शाळा समिती अध्यक्षा सौ.पूर्वजा गुरव, उपाध्यक्ष श्री.अजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.संजना मोरे आदी उपस्थित होते.  “Wild Vegetable Exhibition” at Sheer

Tags: "Wild Vegetable Exhibition" at SheerGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.