गुहागर, ता.08 : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असत. पण गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत नसल्याने रानातील शेती ही संकल्पनाच विसरून गेला आहे. रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे व नुकसानीमुळे रानातली शेती शेतकरी विसरून गेला असला तरी या प्राण्यांचे आक्रमण आता मानवी वस्तीवर होऊ लागले आहे. घराच्या परस बागेत लावलेल्या भाजीपाला ही प्राणी ओरबाडू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे, कौले या छपरांची ही नासधूस होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी यामुळे हैराण झाला आहे. Wild animal nuisance to agriculture


काही वर्षापूर्वी शेतकरी रानात डोंगर उतारावर वाढलेली झाडे तोडून व जागा साफ करून शेती करायचा. तसेच नागली वरीच्या शेतात गवार, काकडी, चिबूड, कारली, भोपळा, दुधी अशा जेवणात आवश्यक असणाऱ्या भाज्या हमखास पिकवायचा. घरात आवश्यक असणाऱ्या वस्तू राखून बाकीच्या बाजारात विकल्या जायच्या. त्यांना गावठी भाजी म्हणून दरही चांगला मिळायचा. गुहागर तालुक्यातील काही मैदानी पठारावरच्या गावातून भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी व्हायची व पीक ही चांगले यायचे. मात्र नागलीवरी पाठोपाठ भुईमुगाचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पठारी भागात आता तीळ ही औषधाला सापडत नाही. नागली भात या बरोबरच जेवणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू शेतकरी आपल्या शेतात पिकवायचा. Wild animal nuisance to agriculture


पण वन खात्याच्या नव्या नियमामुळे रानातील शेतीपेक्षा रानटी लाकडांना मोठे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे शेती कमी झाली व रानातली जंगल तुटू लागली. त्यामुळे जंगल हाच अधिवास असलेल्य जंगली प्राण्यांचा रोजच्या अन्नाचा घास कमी होऊ लागला. उरल्या सुरल्या शेती पिकांवर त्यांचे आक्रमण होऊ लागले. व सततच्या त्यांच्या त्रासाला व होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. Wild animal nuisance to agriculture


मात्र रानटी प्राण्यांचा त्रास त्यानंतही शेतकऱ्यांना भोगावा लागतच आहे. पावसाळ्यात घराच्या मागे परसबागेत मांडव घालून लावलेले काकडी, चिबूड, कारली, पडवळाचे वेल तोडून माकडे चोरून नेत आहेत. अंगणात तयार झालेली भेंडी व इतर भाजीपाला तयार होण्यापूर्वीच माकडे पळवतात. त्यांना किती हि हाकलले तरी माकडांचा थवा दाद देत नाही. मोठ्या आशेने दारात लावलेल्या व जोपासलेत्या या पिकांची आपल्या डोळ्यादेखत होत असलेली नासाडी शेतक-यांना अस्वस्थ करून जाते. घराजवळ व इतर ठिकाणी भरपूर खर्च करून नारळ व पोफळीच्या तयार झालेल्या झाडांवर चढून माकडे तयार झालेले नारळ सोलून खातात व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. मात्र उघड्या डोळ्यांनी बघण्या पातिकडे शेतकरी काहीही करू शकत नाही. यामुळे रानातली शेती सोडल्यानंतर दाराशी घरात खाण्यासाठी काही तरी करावे, हि भावना सुद्धा सद्या शेतकऱ्यांच्या मनातून नष्ट होत आहे. Wild animal nuisance to agriculture