गुहागर, ता. 30 : ग्रामपंचायत पालपेणेने समाजात प्रचलित असलेल्या विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय दि. 28/07/2022 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. याबाबत एकमताने व बहूमताने ठराव मंजूर करण्यात आला. सदर सभेला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. Widow practice stopped in Palpene

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याचे दिलेल्या आदेशानुसार तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. ग्रामपंचायत पालपेणेने सदर विधवा अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याच्या बाबतीत विशेष ग्रामसभेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. Widow practice stopped in Palpene

यासभेला सरपंच सौ. योगिता पालकर, उपसरपंच श्री. रघुनाथ घाणेकर, सौ. नंदिनी खोचाडे, सौ. किर्ती टाणकर, दिलीप पास्टे, सतोष मांडवकर, संतोष पडवेकर, सौ. सुवर्णा महाडीक, सौ. राधिका पासकर (सर्व सदस्य), पोलिस पाटिल कमलाकर आदवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पालकर, ग्रा. वि. अधिकारी सौ. जाधव, शिक्षक अरविंद पालकर, पाटील सर, उमेश खैर, सिताराम नवरत सर, तलाठी श्री. नागरगोजे, डा. कराड, सौ. सोनावणे, ग्रा.पं. कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत अनिष्ठ विधवा प्रथा बंद करणे बाबत एकमताने व बहूमताने ठराव मंजूर करण्यात आला. Widow practice stopped in Palpene
