गुहागर, ता.16 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा रूढी परंपरा प्रथा बंद करून विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा ठराव गुहागर तालुक्यातील ना. गोपाळकृष्ण गोखले जन्मभूमी असलेल्या आदर्श गाव पुरस्कार प्राप्त कोतळूक ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. Widow practice stopped in Kotaluk

गुहागर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेला कोतळूक गावात शासनाचे विविध उपक्रम एकजुटीने राबविण्यात येतात. पतीच्या निधनानंतर सर्वांसमक्ष पत्नीचे कुंकू पुसणे, बांगडया फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे अशी प्रथा सुरू होती. ही प्रथा बंद करून विधवांना सन्मान मिळावा. याविषयी शासनाकडून परिपत्रक काढून प्रत्येक गावात याची अंमलबजावणी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. कोतळूक ग्रामपंचायतीच्या मे महिन्यातील ग्रामसभेत यावर चर्चा करून गावामध्ये जनजागृती करण्याचे निश्चित करण्यात आले होते. १२ बलुतेदार समाज गावामध्ये वास्तव्य करत असल्याने प्रत्येक नागरीकांजवळ समन्वय साधून सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट रोजी झालेल्या कोतळूक ग्रामसभेत पुन्हा एकदा यावर चर्चा करून फक्त कागदावर ठराव न करता प्रत्येक वाडीमध्ये याचे काटेकोरपणे पालन करून यापुढे विधवा महिलांसाठी चालत असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, सिताराम कावणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनिल भेकरे, पोलिस पाटील अनुजा वाघे, प्रगती मोहिते यांनी चर्चेत सहभागी होऊन आपली मते मांडली. Widow practice stopped in Kotaluk

यावेळी पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, उपसरपंच संजीवनी जावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, शितल गोरिवले, सेजल शिगवण, संचिता गुरव, सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनिल भेकरे, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. Widow practice stopped in Kotaluk

