• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषी विभागाकडून उत्पादन वाढीवर भर

by Manoj Bavdhankar
July 22, 2022
in Bharat
16 0
0
White onion

White onion

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन

अलिबाग, ता .22 : रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वतःची ओळख मिळणार आहे.  White onion

अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव आठ गाव येथे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. भात कापणीनंतर जवळपास २०० ते २५० हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर आणि औषधी गुणधर्मामुळे हा कांदा प्रसिध्द आहे. शेतकऱ्यांनी या कांद्याचे शुध्द बियाणे संवर्धित केले आहे. या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ सालच्या कुलाबा राजपत्रात पाहायला मिळतात. त्यामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले. पिढ्यानपिढ्या मोठ्या कष्टाने पांढरा कांदा जोपासला आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आमचा हुरुप वाढला आहे. तसेच कांद्याच्या मागणीत आणि दरातही वाढ होऊ शकेल. – सचिन पाटील, अध्यक्ष White onion

पांढरा कांदा उत्पादक संघ जोरकस मागणी सुरू होती. याबाबत गेली अनेक वर्षे शासन स्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात याबाबत एक करार करण्यात आला होता. १५ अलिबागमधील शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या नावाने इतर पांढऱ्या कांद्याच्या विक्रीस आळा बसेल. आगामी काळात पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जातील. – डी.एस.काळभोर, कृषी अधिक्षक White onion

रायगड जानेवारी २०१९ रोजी पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अलिबाग पांढरा कांदा उत्पादन संघही स्थापन करण्यात आला होता. मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट नोंदणी कार्यालयात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पांढऱ्या कांद्याच्या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या भौगोलिक निर्देशांक विभागाचे प्रमुख जितेंद्र कदम, कल्पेश पाटील, जीएमजीसीचे प्रमुख गणेश हींगमिरे आणि शेतकरी उत्पादक संघाचे शेतकरी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगौलिक मानांकन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वतःची ओळख मिळेल, त्याची नाममुद्रा झळकेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.  White onion

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWhite onionगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.