• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र

by Mayuresh Patnakar
September 8, 2026
in Ratnagiri
16 0
0
Western Ghats Ecologically Sensitive Area
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश

रत्नागिरी, ता. 08 :  केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. Western Ghats Ecologically Sensitive Area

पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवाशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ मधील तरतुदीनुसार मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आपले आक्षेप अथवा हरकती नोंदवता येणार आहेत. नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात ‘पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३’ या पत्त्यावर सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. Western Ghats Ecologically Sensitive Area

जिल्ह्यातील तालुकानिहाय समाविष्ट गावांची संख्या

खेड : ८५ गावे,  संगमेश्वर : ८१ गावे, राजापूर : ५१ गावे, लांजा : ५० गावे, चिपळूण : ४४ गावे, (एकूण ५ तालुके : ३११ गावे) दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांत मिळून एकूण २ हजार ५१५ गावांचा समावेश पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. Western Ghats Ecologically Sensitive Area

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWestern Ghats Ecologically Sensitive Areaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.