महर्षी कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले बीसीए कॉलेज – मंदार सावंतदेसाई
रत्नागिरी, ता. 19 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी अभ्यासासोबत कौशल्ये, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा, एनएसएस यासह अभ्यासेत्तर उपक्रमात भाग घ्यायचा आहे. तिसऱ्या वर्षी कॅंपस इंटरव्ह्यूमधून नोकरीसुद्धा मिळणार आहे. तुम्ही ज्या बीसीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय ते महाराष्ट्रातील पहिले बीसीए कॉलेज असल्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी केले. Welcome to BCA college students
कार्यक्रमात व्यासपीठावर प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, सदस्य सौ. शिल्पा पानवलकर, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत उपस्थित होते. कोरोनानंतर प्रथमच सर्व वर्ग नियमित सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले. सर्व विद्यार्थिनींना पेढा व पेन भेट देऊन द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी उत्साहात स्वागत केले. Welcome to BCA college students
यावेळी मंदार सावंतदेसाई म्हणाले की, तीन वर्षात विद्यार्थिनींना अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. मोबाइल बाजूला ठेवा आणि मन लावून अभ्यास करा. संस्थेचे ग्रंथालय अद्ययावत आहे. कॉलेजचा नॅकचे मानांकन मिळण्यासाठी सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. याकरिता सदस्य डॉ. राजीव सप्रे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे नाव भारतातच नव्हे जगभरात विनम्रपूर्वक घेतले जाते. येथे मूल्यशिक्षणासह आधुनिक युगातले शिक्षणही दिले जाते. देशाचे भवितव्य घडवण्यात स्त्रियांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे या स्त्री शक्तीला बळ देण्याचे कार्य अखंडपणे संस्था करत आहे. तसेच संस्थेने बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे. संस्था नर्सिंग कॉलेज सुरू करत आहे. कोरोना काळात प्रकर्षाने समाजाला नर्सेसचे महत्त्व समजले. Welcome to BCA college students
कार्यक्रमात शिल्पा पानवलकर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून तुम्ही अभ्यास करालच, पण कोणतीही समस्या असल्यास शिक्षकांना जरूर सांगा, ती सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी कॉलेजच्या स्थापनेपासूनची माहिती थोडक्यात सांगितली. १९९९ मध्ये शिरगावात बीसीए कॉलेज सुरू झाले. येथे प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून बहुतांशी विद्यार्थिनींना नोकरीची संधी मिळते. याकरिता पुणे, रत्नागिरीतील विविध कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. त्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण विद्यार्थिनींना दिले जाते. २०१० पासून प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सुरू आहे. एसएनडीटी विद्यापीठात कॉलेजने क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धांत वर्चस्व गाजवले आहे. तसेच एका विद्यार्थिनीनी प्रथम येण्याचा मानही मिळवला आहे. Welcome to BCA college students