रत्नागिरी, ता. 09 : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ९ जूनपासून अहमदाबाद-मंगळुरू मार्गावर साप्ताहिक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या २४ जूनपर्यंत चालवल्या जाणार आहेत. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

यासंदर्भात कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरू गाडी शुक्रवारी, ९, १६ आणि २३ जून रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शन – अहमदाबाद गाडी दर शनिवारी, १०, १७ आणि २४ जून रोजी रात्री ९ वाजून १० सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route

ही गाडी महाराष्ट्रात वसई, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी येथे, तर गोव्यात थिवी, करमाळी, मडगाव येथे थांबणार घेणार आहे. या विशेष गाडीला २२ एलएचबी डबे असतील. त्यात दोन टायर एसी – ३, इकॉनॉमी थ्री टायर एसी – १२, स्लीपर – ३, जनरल – २, जनरेटर कार – १ आणि एसएलआर १ यांचा समावेश आहे. Weekly special train on Ahmedabad-Mangaluru route
