गुहागर, ता, 11 : पंचायत समिती गुहागरच्या कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मढाळ येथील शेतकरी रविंद्र कारकर यांच्या शेतात कलिंगड लागवड करण्यात आली होती. या उत्पादीत केलेल्या कलिंगडचे विक्री केंद्राचे उद्घाटन मढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अंकीता अजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. Watermelon Sales Center at Madhal Pali Phata

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर हे आवर्जून उपस्थित राहिले. तर कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनीही यावेळी उपस्थिती दर्शविली. मढाळ येथील प्रगतिशील शेतकरी रविंद्र कारकर यांनी सूमारे एक एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड केली आहे. ‘सरस्वती’, ‘बाहुबली’, ‘गोल्डन’ या जातीच्या संकरीत बियाण्यांचा वापर करून लागवड करण्यात आली. योग्य पद्धतीने सेंद्रिय व रासायनिक खतांचा मेळ घालून तसे औषधाचा मर्यादित पण योग्य पद्धतीने लागवड करण्यात आली. Watermelon Sales Center at Madhal Pali Phata
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कारकर, सेजल सोलकर, सी.आर.पी. साक्षी चव्हाण, ग्रामसेवक सी.जी. गोरीवले, भरत घेवडे, श्री जाधव, कृषी सहाय्यक डी. के. गिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Watermelon Sales Center at Madhal Pali Phata

